पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही
पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही
हो पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही
पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही
माफ कर पारो मला नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पीकाला गं नाही कवड्या विटल्या
चार बुक शिकं असं कसं सांगु पोरा
गहाण ठेवत्यात बापाला का विचार कोणा सावकारा
गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही
मी नाही बोललो पण पोरा तु तरी बोल काही
हो पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही
पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही
ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हा लय पिळून घेतलं
पण कोरड्या जमीनीनं सारं पिकं गिळून घेतलं
नाही लेकरा भाकरं नाही गुरा चारा
टिपूस नाही आभाळात गावंच्या डोळा धारा
कर्जापायी भटकून शिरपा ग्येला लटकून
कर्जापायी भटकून शिरपा ग्येला लटकून
दारुपायी गेला असं लिवलं त्यांनी हटकून
गडी व्हता मराठी पण राजाला किंमत नाही
गडी व्हता मराठी पण राजाला किंमत नाही
हो पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही
पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही
आई तुझ्या खोकल्याचा घुमतो आवाज़ कानी
नाही मला जमलं गं तुझं साधं औषध पाणी
मैलो मैल हिथं कुठं दवाखाना न्हाई
रोगर मात्र सहजासहजी कुटं बी गावतंय आई
शेतात न्हाई कामंच ते जीव द्याया आलं कामी
शेतात न्हाई कामंच ते जीव द्याया आलं कामी
माजं अन सरकारचं ओजं आता व्हईल कमी
मरता मरता कळलं हिथं शेतकऱ्या किंमत न्हाई
मरता मरता कळलं हिथं शेतकऱ्या किंमत न्हाई
हो पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही
पत्रास कारण की बोलायची हिम्मत